पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा? पंजाब डख म्हणतात….

पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 18 ऑगस्ट पासून पावसाला सुरवात होणार आहे. परंतु नारळी पौर्णिमेपासून म्हणजेच रक्षाबंधनापासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. रक्षाबंधनापासून आगामी 12-13 दिवस म्हणजे जवळपास पोळ्यापर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Published on -

Panjab Dakh News : गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र पावसाची तीव्रता 17 ऑगस्ट पासून वाढली आहे. 16, 17 आणि 18 ऑगस्टला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. अशातच, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पौर्णिमा पासून ते अमावस्यापर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार, कुठे पावसाची रिमझिम राहणार, कुठे हवामान कोरडे राहणार? याबाबत पंजाबरावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

पंजाबरावांचा नवीन अंदाज

पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 18 ऑगस्ट पासून पावसाला सुरवात होणार आहे. परंतु नारळी पौर्णिमेपासून म्हणजेच रक्षाबंधनापासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. रक्षाबंधनापासून आगामी 12-13 दिवस म्हणजे जवळपास पोळ्यापर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात आता पोळ्यापर्यंत म्हणजेच येत्या अमावस्यापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लासलगाव, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे, जळगाव या भागात अजून पर्यंत चांगला मुसळधार पाऊस झालेला नाही. पण, या काळात या संबंधित भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, कडा, आष्टी, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर या कालावधीत 2 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या संबंधित भागात 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरीही पावसाचा जोर हा 25 ऑगस्ट नंतर आहे कायम राहणार असून दोन सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अमावस्यापर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!