बाळसाहेब नाहाटा यांना धक्का, अजित पवार अहमदनगरमध्ये मोठी खेळी करण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे आता अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार असोत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असोत या दोघांचेही अहमदनगर जिल्ह्यावर बारीक लक्ष.

Ahmednagarlive24 office
Updated:
ajit pawar

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे आता अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार असोत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असोत या दोघांचेही अहमदनगर जिल्ह्यावर बारीक लक्ष. आता अजित दादा अहमदनगर जिल्ह्यात वेगळी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

बाळसाहेब नाहाटा यांना धक्का
लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्य बाजार समितीचे सभापती बाळसाहेब नाहाटा यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नाहाटा यांच्या कामगिरीवर प्रदेशपातळीवरून नाराजी व्यक्त झाल्याने आता पुन्हा जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाहाटा यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी देखील प्रदेशाध्यक्षांकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परंतू गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल जिल्ह्यातील सर्व आमदारांसह नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नव्याने पक्ष संघटना बांधणी करण्यात गायकवाड अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

त्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब नाहाटा यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता नाहाटा यांच्या नियुक्तीला सहाच महिने झाले. त्यानंतर लगेचच नाहाटा हटावच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राजेंद्र गुंड यांचे नाव आघाडीवर
नाहाटा यांना जिल्हाध्यक्षपदावर हटविल्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांचा नगर दक्षिणमध्ये चांगला लोक संपर्क असून ते तळागाळापर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील.

त्यामुळे त्यांच्या नाव सध्या तरी आघाडीवर आहे. तसेच गुंड यांना जर जिल्हाध्यक्ष केले तर कर्जत जामखेडमध्ये आ. रोहित पवार यांना रोखण्यात अजित पवार यांना यश येणार आहे.तसेच रोहित पवार यांच्याविरोधात जर अजित पवार घरातीलच एखादा सदस्य उभा राहिला तर गुंड यांचे सहकार्य त्यांना मिळू शकते असेही गणित यामागे असू शकते अशी चर्चा आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe