iPhone 16 Launch Date : Apple दरवर्षी सप्टेंबर मध्ये iPhone ची नवीन सिरीज लॉन्च करत असते. यंदाही भारतीय बाजारात आयफोनची नवीन सिरीज लॉन्च होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये आयफोनची 16 सिरिज लॉन्च केली जाणार आहे. दरम्यान iPhone 16 लाँचिंग इव्हेंटबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा लॉन्चिंग 16 पार पडेल असा दावा केला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 16 प्रो मॅक्स, आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्लस आणि आयफोन 16 यासह चारही आयफोन 10 सप्टेंबर रोजी लॉन्च होऊ शकतात. पण या हँडसेटची विक्री 20 सप्टेंबर पासून सुरू होणार अशी शक्यता आहे. दरम्यान, आज आपण या अपकमिंग 16 सीरिजचे फिचर्स अन किमती कशा राहणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे असणार कलर ऑप्शन
मीडिया रिपोर्ट नुसार, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस ब्लॅक, ग्रीन, पिंक, ब्लु आणि व्हाईट कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. म्हणजे यात पर्पल अन येलो पर्याय राहणार नाही. दुसरीकडे, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ब्लॅक, व्हाईट किंवा सिल्वर, ग्रे किंवा नेचुरल टायटॅनियम आणि ब्लू टायटॅनियमच्या जागी रोज गोल्ड किंवा ब्रॉन्ज कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
डिझाईन स्पेसिफिकेशन आणि फीचर्स कसे राहणार?
अँपल आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस त्यांच्या पूर्वीच्या मॉडेलप्रमाणेच सेम साईज मध्ये येणार आहेत. पण याच्या डिझाईन मध्ये किरकोळ बदल दिसतील. यातील एक मोठा बदल म्हणजे यामध्ये नवीन व्हर्टिकल लेन्स कॅमेरा अरेंजमेंट पाहायला मिळणार आहे.
मागील मॉडेलमध्ये असणारा डायगोनल सेटअप यंदा दिसणार नाही. कंपनी सर्व आयफोन 16 मॉडेल्सवर नवीन कॅप्चर बटण देखील देणार आहे, जे वापरकर्त्यांना डिजिटल कॅमेरा शटर बटणाप्रमाणेच मल्टिपलं लेव्हल प्रेशरसह फोकस आणि छायाचित्रे घेण्यास अनुमती देणार आहे.
हे ऍपलच्या व्हिजन प्रो हेडसेटसाठी स्थानिक व्हिडिओ रेकॉर्डिंगला अनुमती देणार आहे. आयफोन 16 प्रो मॉडेल्सची साईज गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच अपग्रेड केली जाणार असा देखील दावा केला जात आहे. रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल, तर iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले असेल.
आयफोन 16 प्रो मॉडेल्समध्ये टेट्राप्रिझम 5x ऑप्टिकल झूम लेन्सचा समावेश असेल, जो पूर्वी प्रो मॅक्स मॉडेलसाठी होता. आयफोन 15 प्रो मॉडेल्समधील ॲक्शन बटण आता आयफोन 16 लाइनअपच्या सर्व मॉडेलमध्ये उपलब्ध राहणार आहे. हे बटण फ्लॅशलाइट सक्रिय करणे, कॅमेरा किंवा शॉर्टकट लाँच करणे यासारखी विविध कार्ये करते.
आयफोन 16 मध्ये 3,561mAh बॅटरी आणि Pro Max मध्ये 4,676mAh बॅटरी पॅक राहील. म्हणजे बॅटरीची क्षमता थोडीशी वाढवली गेली आहे. प्रो मॉडेल्स फास्टर 40W वायर्ड चार्जिंग आणि 20W MagSafe चार्जिंगला सपोर्टिव्ह असतील असा दावा केला जात आहे. शिवाय iPhone 16 चे सर्व मॉडेल्स नवीनतम N3E 3-नॅनोमीटर नोडवर तयार केलेल्या नवीन A-सिरीज चिप्सद्वारे रन होणार आहेत.
किंमती कशा असतील?
किमती बाबत बोलायचं झालं तर आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस ची किंमत गेल्या मॉडेल प्रमाणेच राहणार आहे. म्हणजे या दोन्ही मॉडेलच्या किमती अनुक्रमे 79,900 आणि 89 हजार 900 एवढ्या असतील. मात्र 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्स च्या किमती प्रत्येकी दहा हजाराने वाढवल्या जाणार आहेत. सध्याच्या मॉडेलच्या म्हणजे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅच च्या किमती अनुक्रमे एक लाख 34 हजार 900 आणि एक लाख 59 हजार 900 अशा आहेत.