Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा राज्य सरकारने ब वर्ग तिर्थक्षेत्रात समावेश केला आहे. यापूर्वी पारनेर तालुक्यातील ३ देवस्थाने ब वर्गात आहेत, त्यामध्ये संत निळोबाराय देवस्थान पिंपळनेर,
कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, मळगंगा देवस्थान निघोज, हे देवस्थान ब वर्गात असून, आता चोथे ब वर्ग देवस्थान जातेगावला मिळाले आहे. त्यामुळे तालुक्यातील वैभवात भर पडली आहे.
ब वर्ग मिळाल्याने देवस्थान विकास कामात झपाट्याने वाढ होईल, असे अध्यक्षा सुनिता पोटघन यांनी सांगितले. श्री भैरवनाथ देवस्थान हे नगर-पुणे हायवेवरून १ किमी. च्या अंतरावर व निसर्गरम्य परिसरात आहे.
या देवस्थान ट्रस्टचे १९९१ साली रजिस्टेशन झाले आहे. या मंदिराची पुरातन विभागाकडे इ.स. १२२९ मध्ये त्या मंदिरासाठी दिपमाळ साठीच्या खर्चाची नोंद आढळली आहे. जातेगाव येथे अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांतून तसेच महाराष्ट्रासह ५ राज्यांतून लाखो भाविक भक्त येत असतात.
हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात व खोल दरीत बसले आहे, या देवस्थानचा चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा यात्रा उत्सव भरतो.जवळ जवळ चार पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. पानोली, पळवे खु., पळवे बु., वाडेगव्हाण, नारायणगगव्हाण, या पाच प्रमुख गावांची पालखी सोहळा असतो.
अनेक गावचे मानकरी येतात, लाखो रुपयांची शोभेची दारू उडवली जाते. तसेच दर रविवारी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. देवस्थान ब वर्गात आणण्यासाठी विठ्ठल भगवंत पोटघन, भैरवनाथ देवस्थानच्या अध्यक्षा सुनिता विठ्ठल पोटघन व सचिव सचिन चद्रकांत ढोरमले,
उपाध्यक्ष सुरेश बोरूडे सर, कै. शिवराम पोटघन, खजिनदार, सभापती गणेश शेळके, दत्तात्रय ढोरमले, विजय जगताप, विशाल फटांगडे, निर्मला कळमकर, शिवाजी भगत, जयसिंग धोत्रे, सोनाली ढोरमले, रुपाली पोटघन, गणेश वाखारे, सविता ढोरमले व सर्व विश्वस्त मंडळाने प्रयत्न केले आहे.
मंत्री दिलीपराव वळसे पाटील, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी देवस्थान पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.