कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेतून दहा दिवसांत राज्यातील एक लाख ५५ हजार ९८० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ५१ हजार ४९८ युवकांची निवड करण्यात आली असून,
२२ हजार ५६५ उमेदवार शासकीय, तसेच खासगी आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत. रुजू झालेले हे तरुण पुढील सहा महिने विविध कार्यालयांत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी २० ऑगस्ट पर्यंत राज्यातील एक लाख ५५ हजार ९८० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात सात हजार ३४४ शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये दोन लाख ६७ हजार ६६२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत.
लाख ५५ हजार ९८० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली.शासनाच्या अधिकृ त संकेतस्थळावर नोंद केलेल्या एक लाख ५५ हजार ९८० उमेदवारांपैकी ५१ हजार ४९८ युवकांची निवड झाली असून, २२ हजार ५६५ प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत.
या प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन त्यांच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) ऑनलाइन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे.
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता
या योजनेसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. उमेदवारांचे बँक खाते हे आधारकार्डशी जोडलेले असावे. या योजनेचा लाभार्थी उमेदवार हा मूळचा महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे.
राज्यातील बेरोजगार तरुणच योजनेसाठी पात्र असणार आहेत. शैक्षणिक पात्रता किमान १२ वी पास, डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक आहे.
दोन लाख ६७ हजार पदे रिक्त
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यात दोन लाख ६७ हजार ६६२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत.
यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ८२ हजार ६७४, पुणे ५० हजार ६९६, नाशिक ३८ हजार ३८२, संभाजीनगर ४६ हजार ७१९, नागपूर २६ हजार ६०५, अमरावती २२ हजार ५८६ पदे रिक्त आहेत.