आज (दि.२१) कोपरगाव येथे ज्येष्ठ नेते अशोकराव काळे यांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर नेते मंडळी देखील उपस्थित होती.
या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण होते. परंतु ते इतर ठिकाणी असल्याने माजी खा. सुजय विखे यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.
अजित पवार व विखे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर कार्यक्रमात एकच चर्चा सुरु झाली होती.
काय म्हणाले माजी खा. सुजय विखे?
सुजय विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले, या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण होते. परंतु त्यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमास आधीच वेळ दिलेली होती. त्यामुळे ते तिकडे गेले.
आ. आशुतोष काळे यांनी मला आमंत्रित केलं होत. परंतु आम्हाला सवय असते की ९ चा कार्यक्रम ११ ला सुरु होतो. परंतु या कार्यक्रमाला स्वतः अजित दादा आलेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला अजित दादांच्या वेळ पाळण्याबाबत माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राने दादांच्या वेळ पाळण्याबाबतचा अनुभव घेतला आहे.
आज मी पण हा अनुभव घेतला. दादा अगदी वेळेत लँड झाले व कार्यक्रमासही ते वेळेत पोहोचले. महाराष्ट्राने घेतलाय, आज मला अजितदादांचा चांगलाच अनुभव आला असे विखे म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे.