7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला जाणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता वाढणार आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता वाढवला जात असतो. यंदाचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2024 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार जानेवारी 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. आधी हा भत्ता 46% एवढा होता.
महागाई भत्तामध्ये वाढ
म्हणजेच यामध्ये चार टक्क्यांची वाढ करून हा भत्ता 50 टक्के करण्यात आला आहे. दरम्यान आता जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील एलआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्तामध्ये तीन टक्क्यांची वाढ करणे विचाराधीन आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच हा भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे. याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये घेतला जाईल असे म्हटले जात आहे.
फरकाचा लाभ मिळणार
तथापि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ मिळणार आहे.
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय. यामुळे नक्कीच सरकारी नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार आहे.
निर्णय कधी निघणार?
खरेतर महागाई भत्ता 53% होणार हे नुकत्याच काही दिवसांपूर्वी जून महिन्याची एआयसीपीआयची आकडेवारी समोर आल्यानंतर स्पष्ट झाले होते. मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय कधी निघणार? याचा लाभ कधीपासून मिळणार? हा प्रश्न होता. पण आता याचे उत्तर मिळाले आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीलं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच…
सप्टेंबर महिन्यात याबाबतचा शासन निर्णय होईल आणि त्याच महिन्याच्या पगार सोबत म्हणजेच जो पगार कर्मचाऱ्यांच्या हातात ऑक्टोबर महिन्यात येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.
याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात झाला तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच मिळणार आहे.