अंतरवाली सराटी येथे काल २२ ऑगस्टला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रजनीताई पाटील यांनी गुरुवारी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. या भेटीची सर्वत्र चर्चा होऊ लागली.
त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो तेथे केवळ त्यांची तब्येतीची विचारपूस केली असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. परंतु ही भेट वेगळ्याच राजकीय कारणासाठी होती अशी चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
आम्ही जुलै २०१४ साली अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आमचे सरकार गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि त्यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे ते आरक्षण टिकले नाही,
असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला आहे. जरांगे-पाटील यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येथे आलो होतो असे ते म्हणाले.
राहुल गांधींचा निरोप?
पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांचा कसलातरी निरोप घेऊन गेले होते. आगामी विधानसभेच्या अनुशंघाने हा निरोप होता अशी चर्चा खासगीत रंगली आहे.
परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आजवर कुणाचे काही ऐकले नाही त्यामुळे ते चव्हाण यांचे किती ऐकतात हा देखील प्रश्न आहे अशी चर्चा आहे.
मराठा आरक्षण लढ्याला आघाडी सरकारने वाचा फोडली
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याला आमच्या आघाडी सरकारने पहिल्यांदा वाचा फोडली. मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आता सरकार म्हणून त्यांनी निर्णय घ्यावा, असे म्हणत चव्हाण यांनी राज्य सरकारच्या पुढ्यात चेंडू टाकला.
चर्चा नव्हे, मागणी मान्य करा, असे सांगून चव्हाण यांनी जरांगे-पाटील यांना वाशी येथे जे आश्वासन दिले होते, ते आम्हाला सांगितले नाही. त्यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागल्याची खरमरीत टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.