सुप्यात उभे पाच एकरात राहतेय अग्निशमन स्टेशन ! किती खर्च? कसा होणार फायदा? पहा..

सुपे हा परिसर तेथे एमआयडीसी असल्याने नेहमीच गजबलेला असतो. अनेकांना रोजगार देणारा भाग म्हणून परिचित. येथे असणाऱ्या कंपनीत जिल्हाभरातील अनेक तरुण पोट भारतात. आता या सुपे (म्हसणे फाटा) परिसरातच पारनेर तालुक्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन विभागाचे स्टेशन उभारले जात आहे.

Ahmednagar News : सुपे हा परिसर तेथे एमआयडीसी असल्याने नेहमीच गजबलेला असतो. अनेकांना रोजगार देणारा भाग म्हणून परिचित. येथे असणाऱ्या कंपनीत जिल्हाभरातील अनेक तरुण पोट भारतात.

आता या सुपे (म्हसणे फाटा) परिसरातच पारनेर तालुक्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन विभागाचे स्टेशन उभारले जात आहे. नवीन एमआयडीसीत हे भव्य स्टेशन उभे राहणार आहे.

सुमारे ४८ कोटी ९६ लाख रुपये खर्च करून पाच एकरात अत्याधुनिक अग्निशमन विभागाचे स्टेशन उभारले जाईल. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

कसा होईल फायदा?
पारनेर तालुक्यात तसेच सुपे येथे असलेल्या दोन एमआयडीसींच्या सुरक्षिततेसाठी या अग्निशमन स्टेशनचा फायदा होईल. संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीने ती सुरक्षितता ठरणार आहे. पारनेर तालुक्याचा विचार जर केला तर विस्ताराने हा मोठा जिल्हा.

तालुक्यात सुमारे १३१ गावे आहेत. याशिवाय दोन एमआयडीसी. त्यामुळे सारासार विचार करता तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणेची गरज होती. ती या आधुनिक अग्निशमन स्टेशनमुळे पूर्ण होणार आहे.

तालुक्यात किंवा एमआयडीसीत आग लागली, तर थेट शिरूर किंवा नगर येथून अग्निशमन यंत्रणा येई. तोपर्यंत ती मालमत्ता जळून खाक होत असे, तसेच यात अनेकदा प्राणहानी होत होती.

आता सुपे येथील जुन्या आणि नव्या, अशा दोन्ही एमआयडीसी व तालुक्याचा विस्तार, वाढती लोकसंख्या याचा विचार करता हे अग्निशमन स्टेशन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

कोट्यवधी खर्च
४८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. येथे दोन बंब ठेवण्यात येतील. याठिकाणी कर्मचारी निवासस्थाने व परेड मैदान देखील असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe