आज अन उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार ! के.एस होसाळीकर यांची माहिती

भारतीय हवामान खात्यातील हवामानतज्ञ के एस होसाळीकर यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू असून या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. शेती पिकांना देखील या जास्तीच्या पावसाचा फटका बसत आहे.

मध्यंतरी पावसाने सात-आठ दिवस दडी मारली होती अन यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तेव्हा शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता राज्यातील काही भागातील शेतकरी बांधव जास्तीच्या पावसाने अडचणीत आले आहेत.

दरम्यान भारतीय हवामान खात्यातील हवामानतज्ञ के एस होसाळीकर यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. तसेच काही जिल्ह्यांना गेलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आता आपण होसाळीकर यांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस ?

24 ऑगस्ट : आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या सदरील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अर्थातच या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता ही सर्वाधिक राहणार आहे.

यामुळे येथील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील सावध राहणे आवश्यक आहे. आज उत्तर कोकणातील मुंबई , पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, विदर्भातील अमरावती, अकोला या जिल्ह्यांनां जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

25 ऑगस्ट : उद्या दक्षिण कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.

उद्या मुंबई, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe