मोठी बातमी ! Tata Curvv पेट्रोल/डिझेल ‘या’ तारखेला लॉन्च होणार, काय असेल खास ?

येत्या 9 दिवसांत कर्वचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट लॉन्च होणार आहे. ही गाडी लाँच झाल्यानंतर Citroen Basalt, Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Grand Vitara सारख्या कारशी स्पर्धा करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या आगामी Curvv पेट्रोल आणि डिझेलचे फीचर्स आणि किमती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Tata Curvv Petrol And Diesel Price

Tata Curvv Petrol And Diesel Price : Tata Motors भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपली बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित Curvv EV ही इलेक्ट्रिक कार भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. Tata Curvv Ev लाँच करून पहिल्यांदाच कंपनीने एखाद्या मॉडेलचे ICE वर्जन लॉन्च करण्यापूर्वी इलेक्ट्रिक वर्जन लॉन्च केले आहे.

दरम्यान, कंपनी लवकरच Curvv चे ICE वर्जन लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Tata Curvv चे पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट 2 सप्टेंबरला लाँच केले जाणार आहे. अर्थातच सप्टेंबरच्या सुरुवातीलाच टाटा कंपनीचा एक मोठा लॉन्चिंग सोहळा आयोजित होणार आहे.

येत्या 9 दिवसांत कर्वचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट लॉन्च होणार आहे. ही गाडी लाँच झाल्यानंतर Citroen Basalt, Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Grand Vitara सारख्या कारशी स्पर्धा करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या आगामी Curvv पेट्रोल आणि डिझेलचे फीचर्स आणि किमती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा कर्व्हचे डिझाईन कसे राहणार

मिळालेल्या माहितीनुसार, आघाडीची कार उत्पादक टाटा कर्वला आधुनिक आणि प्रीमियम डिझाइन देणार आहे. या SUV मध्ये पूर्ण-रुंदीचा LED DRL, कनेक्टेड LED टेललाइट्स, स्प्लिट LED हेडलाइट, 18-इंच अलॉय व्हील, फ्लश डोअर हँडल राहणार आहेत. या कारमध्ये 500 लीटरची बूट स्पेस सुद्धा राहणार आहे. ही कंपनीची पहिलीच कुपे स्टाईल SUV असेल. या गाडीचे डिझाईन ग्राहकांना आवडतील अशी कंपनीला आशा आहे.

इंजिन कसे राहणार बरं?

Tata Curvv ICE मध्ये तीन इंजिनांचा पर्याय राहणार आहे. ही गाडी टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध होईल. यात 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन, एक नवीन 1.2-लीटर T-GDI टर्बो-पेट्रोल आणि परिचित नेक्सॉन-स्रोत 1.5-लिटर डिझेल राहणार आहे.

1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 125 पीएस पॉवर जनरेट करेल. दुसरे 1.2 लीटर T-GDI टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 120PS ची पॉवर जनरेट करेल. अन तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन असेल. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल.

कसे असतील फिचर्स

Curvv EV लॉन्च झाल्यानंतर याचे ICE मॉडेल्स कसे राहणार याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की याच्या ICE मॉडेल्समध्ये अनेक भन्नाट फीचर्स राहणार आहेत. या गाडीमध्ये 12.3 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर्ड टेलगेट आणि पॅनोरमिक सनरूफ मिळणार आहे. त्याची स्टीयरिंग टाटा हॅरियरसारखी असेल.

याशिवाय या गाडीत टच सेन्सिटिव्ह एसी कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, 9-स्पीकर हरमन साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जर मिळणार आहे. या गाडीमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स राहतील. सुरक्षेसाठी या कारला EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबॅग्ज, फ्रंट-रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, 360 डिग्री कॅमेरा, ADAS आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर दिले जाणार आहेत.

Tata Curvv चे व्हेरीएंट्स

Tata Curvv चार ब्रॉड ट्रिम्समध्ये ऑफर केली जाणार आहे. स्मार्ट, प्युअर+, क्रिएटिव्ह, ॲक्प्लिश्ड असे हे चार व्हेरीएंट्स असतील.

किंमत किती राहणार?

या गाडीची किंमत किती राहणार या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या गाडीची किंमत ही 9.15 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि 17.30 लाख रुपयांपर्यंत जाणार असे म्हटले गेले आहे. ही गाडीची एक्स शोरूम किंमत राहील अन ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe