Upcoming Car In India : गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सची मागणी वाढली आहे. सेडान ऐवजी आता ग्राहक SUV कारला अधिक पसंती दाखवत असल्याची वास्तविकता आहे. याबाबत एक आकडेवारी देखील समोर आली आहे.
यानुसार, जानेवारी ते जून 2024 या कालावधीतील एकूण कार विक्रीपैकी 52 टक्के वाटा हा एकट्या SUV सेगमेंटचा आहे. यावरून आपल्या देशात एसयूव्ही गाड्यांना किती मार्केट आहे याचा अंदाज लावता येतो.
विशेष म्हणजे SUV गाड्यांचे मार्केट पाहता आता वेगवेगळ्या कंपन्या नवनवीन एसयुव्ही बाजारात लॉन्च करत आहेत. पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्येही भारतीय कार बाजारात दोन नवीन एसयूव्ही लॉन्च होणार आहेत.
Hyundai India आणि भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स नवीन SUV लाँच करणार आहे. या दोन्ही कंपन्या दोन नवीन मध्यम आकाराच्या SUV लाँच करणार आहेत. दरम्यान, आता आपण या दोन्ही आगामी एसयूव्ही कार्सबाबत माहिती पाहणार आहोत.
Tata Curvv ICE : नुकत्याच काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने Curvv Electric SUV लॉन्च केली आहे. खरेतर ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. दरम्यान आता कंपनी या गाडीची ICE आवृत्ती पुढील महिन्यात लॉन्च करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 3 सप्टेंबरला Tata Curvv ICE मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. ग्राहकांना या आगामी टाटा कर्वमध्ये 3 इंजिनचा पर्याय मिळेल. यामध्ये पहिले 1.2-लिटर पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर GDI पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे.
या आगामी Tata Curve मध्ये, ग्राहकांना एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी ग्राहकांना कारमध्ये ADAS तंत्रज्ञानही मिळू शकते असा दावा केला जात आहे.
ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट : Hyundai एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी भारतात कार विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर आणि ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
दरम्यान आता हीच लोकप्रिय कंपनी पुढील महिन्यात आपल्या लोकप्रिय SUV चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. Alcazar चे फेसलिफ्ट व्हर्जन पुढील महिन्यात लॉन्च केले जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे.
या आगामी Hyundai Alcazar Facelift ची लॉन्चिंग 9 सप्टेंबरला होणार आहे. ग्राहकांना या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान आणि 70 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये मिळतील. मात्र, एसयूव्हीच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी SUV मध्ये, ग्राहकांना 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल जे जास्तीत जास्त 160bhp ची पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. तर आणखी 1.5-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील असेल जो 116bhp ची कमाल पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे.