Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक धुमाकूळ पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढू लागली आहे.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असल्याने येथील धरणांमधील पाणी हे पैठण येथील जलाशयात सोडले जात आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आत्तापर्यंत जायकवाडी धरणात 39 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. जर समजा पुढील आठवडाभर असेच हवामान राहिले, असाच पाऊस सुरू राहिला तर जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 50 टक्क्यांवर पोहोचण्याची आशा आहे.
भारतीय हवामान खात्याने आजपासून 29 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार राज्यातील हवामान ?
26 ऑगस्ट 2024 : आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील मुंबई, पालघर, उत्तर कोकणातील धुळे, जळगाव, विदर्भातील, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
27 ऑगस्ट 2024 : उद्या नाशिक, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
28 ऑगस्ट 2024 : दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
29 ऑगस्ट 2024 : विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना, दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.