वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक लाचलुचपतच्या जाळ्यात ! कर्जप्रकरणासाठी लाच..

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे (छत्रपती संभाजीनगर) प्रादेशिक व्यवस्थापक तथा नगरचे अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक दत्तु आश्रुबा सांगळे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Ahmednagarlive24 office
Published:
lachluchapt

Ahmednagar News : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे (छत्रपती संभाजीनगर) प्रादेशिक व्यवस्थापक तथा नगरचे अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक दत्तु आश्रुबा सांगळे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सांगळे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

या प्रकरणाची अँटी करप्शनच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय आहे. सदर व्यवसयासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडे वैयक्तीक कर्ज परतावा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला, कर्ज व्याज परतावा

ऑनलाईन प्रकरण प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्याकडे संबंधित अधिकाऱ्यानी लाचेची मागणी केली. या बाबत २४ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने अंटी करप्शनकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार ५०० रुपये लाचेची रक्कम स्विकारताना दत्तु आश्रुबा सांगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक प्रविण लोखंडे, पोलिस निरीक्षक राजू अल्हाट, पोलिस अंमलदार किशोर लाड, बाळासाहेब कऱ्हाड, रविंद्र निमसे, सचिन सुद्गीक, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe