उच्च शिक्षण देणे सध्या खूप महागडे झाले असल्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना देखील आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही व त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारची पावले उचलण्यात येतात.
यामध्ये अनेक शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मदत करतात. तसेच शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय सध्या उपलब्ध असून अनेक बँकांच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक लाभ देऊन शिक्षणासाठी मदत केली जाते.
अगदी याच पद्धतीचे कौतुकास्पद पाऊल रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रिलायन्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना तब्बल सहा लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप देणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी खूप मोठा फायदा मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असून याचा लाभ जवळपास 5100 विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे व संपूर्ण देशातील ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल असे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकणार आहेत.
पदवी अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून बघितले तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विषयात शिष्यवृत्ती दिली जात असून प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला दोन लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता
1- जे विद्यार्थी पदवी पूर्व किंवा पदवीत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेणार आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.तसेच जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतील ते विद्यार्थी कोणत्याही विषयात अर्ज करू शकतात व अशा विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता पाहून व कौटुंबिक उत्पन्न किती आहे याच्या आधारे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
2- पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये तंत्रज्ञान, जीवन विज्ञान तसेच ऊर्जा व अभियांत्रिकी विषयांमध्ये शिष्यवृत्ती दिली जाणार असून ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जे विद्यार्थी पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असतील अशा विद्यार्थ्यांना 6 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
रिलायन्स फाउंडेशन याबाबतीत खूप मोठे काम करत असून आतापर्यंत 23 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जाणाऱ्या या स्कॉलरशिपबद्दल अधिक माहिती हवी असेल तर विद्यार्थी…
www.scholarship.reliancefoundation.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच जे इच्छुक व पात्र उमेदवारांना या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल त्याकरिता शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 आहे.