देशवासीयांसाठी नुकतीच एक खुशखबर मिळाली. लवकरच देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
या ट्रेनविषयी सध्या सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. ही ट्रेन तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे.

या ट्रेनमध्ये जबरदस्त आधुनिक सुविधा, खतरनाक फीचर्स समाविष्ट आहेत. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत..
– रात्री १० वाजण्याच्या आसपास प्रवासी ट्रेनमध्ये बसतील आणि सकाळी गंतव्यस्थळी पोहोचेल. मध्यमवर्गीयांना विचारात घेऊन गाडी बनविली असून राजधानी एक्स्प्रेसएवढे भाडे राहील.
– नव्या गाडीत संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी येईल.
– नवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबुती वाढते.
– ट्रेनचे डबे आणि शौचालय अपग्रेड करण्यात आले आहे.
– याशिवाय ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत.
– देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविली आहे
– सीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची सोय, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही.
– प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर
– वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना
– सामान ठेवण्यासाठी जास्त जागा.
– दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ
– ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा
कधी होणार लॉन्च
बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात ही ट्रेन तयार करण्यात आली असून वैष्णव यांनी नव्या रेल्वेची पाहणी केली. काही दिवसांमध्ये ती कारखान्यातून बाहेर आणली जाईल.
सुरुवातीला १० दिवस गाडीची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दोन महिने या गाडीची रूळांवर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर ही गाडी लाँच करण्यात येणार आहे.