वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे का? नका करू काळजी! ‘ही’ योजना करेल तुम्हाला मोठी मदत

Ahmednagarlive24 office
Published:

विजबिल थकबाकी हा महावितरण समोरील एक मोठा गंभीर प्रश्न असून अशा विज बिल थकबाकीदारांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांपासून तर औद्योगिक ग्राहकांचा मोठा समावेश आहे. जर आपण याबाबतची विजबिल थकबाकीमुळे कनेक्शन कट केलेल्या राज्यातील ग्राहकांची संख्या पाहिली तर ती तब्बल 38 लाख रुपये इतकी आहे.

तसेच जर आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बघितला तर त्यानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार तसेच ताबेदार यांना वीज बिल थकबाकीची रक्कम भरणे हे बंधनकारक आहे. परंतु अशा थकबाकीदारांवर थेटपणे कायदेशीर कारवाई न करता मधला मार्ग म्हणून एक सप्टेंबर पासून अभय योजना लागू करण्यात आली आहे व या योजनेमध्ये विज बिल थकबाकी व त्यावरील व्याज तसेच विलंब शुल्क असे म्हणून 1788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत.

कुणाला मिळेल महावितरणच्या अभय योजनेचा लाभ?

महावितरणाच्या राज्यातील 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकरिता ही योजना आहे. परंतु या योजनेमध्ये कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आलेला नाही.

या योजनेचा कालावधी एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब शुल्क स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे.

त्यामध्ये अशा ग्राहकांना मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उरलेली 70 टक्के रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात येणार आहे. तसेच जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत विजबिल भरतील त्यांना दहा टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे.

कसा घ्याल या योजनेचा लाभ?

तुम्हाला देखील महावितरणच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही..

www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतात. यासोबतच 1912 किंवा 1800-2333-435/1800-212-3435 या टोल फ्री क्रमांक वर फोन करून देखील माहिती घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर ग्राहकांनी जर पैसे भरले तर त्याचे वीज कनेक्शन नियमित करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe