Ahmednagar news : सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य पुरते वैतागले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात रोष वाढत आहे. दरम्यान श्रीगोंदा शहरात भाजप सरकारवर टीका-टिपण्णी करणारे पोस्टर्स विविध ठिकाणी पाहायला मिळाल्याने या पोस्टरची शहरासह तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती.
राज्य व केंद्रातील सरकारवर निशाणा साधणारे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावल्याचे दिसून आल्याने नागरिक आवर्जून थांबत या पोस्टरकडे पाहत होते. या पोस्टरवर जीएसटीपासून महागाईपर्यंत अनेक मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
कुठे खर्चावर चर्चा तर कुठे पाकिटमार उल्लेख करीत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर अधिक तर जीएसटी श्रीमंतांच्या वापरातील वस्तूंवर तुलनेने कमी जीएसटी आकारला जात म्हटले असल्याचे आहे.
त्याचबरोबर वाढत्या महागाईवरून देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. श्रीगोंदा शहरातील परिसरात ठिकठिकाणी आक्षेपार्ह व्यंगचित्राचे पोस्टर्स झळकले आहे. मात्र या व्यंगचित्राचे पोस्टर नेमके लावले कोणी याबाबत जोरदार चर्चेला उधाण आले महागाई मधून जनतेच्या खिशाला कात्री अश्या आशयाचे पोस्टर्स लावण्यात आली आहे.
श्रीगोंदा शहरातील अतिशय मोक्याच्या ठिकाणी व्यंगचित्रकाढून भाजपच्या नावाने जनतेच्या खिश्याला कात्री लावली तसेच जनतेचा सरकारने कसा खिसा मारला
आहे. यामध्ये जनतेसाठी नेहमी लागणाऱ्या दुचाकी, फ्रिज, मोबाईल, टूथपेस्ट, वस्तू महाग तर नेत्यांना लागणाऱ्या हेलिकॉप्टर, विमानसेवा, हिरा, क्रूज जहाज वस्तू भाजपच्या काळात स्वस्त झाल्याचे खुलेआम दाखविले आहे.
त्यामध्ये भारतीय जनतेचे पाकीटमार तसेच वधारलेले दर अश्या आशयाचे व्यंगचित्राचे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे पोस्टर श्रीगोंदा बस स्थानक परिसरात, पंचायत समितीच्या प्रवेश द्वाराजवळ तहसील कार्यालयाच्या गेटजवळ अश्या अनेक ठिकाणी लावण्यात आले. पोस्टर पाहिल्यावर नागरिकांनी याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी याबाबत तात्काळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना संप्रर्क साधून याबाबत माहिती दिली त्यांनी तात्काळ आपले कर्मचारी पाठवून शहरातील सर्व व्यंगचित्राचे पोस्टरसह फलक काढले मात्र तरीही काही ठिकाणी दिवसभर पोस्टर आणि फलक झळकत होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते.