आता जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायतीत जावे लागणार नाही, ‘या’ एप्लीकेशनमधून सर्व कागदपत्रे मिळणार

शासनाच्या माध्यमातून आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यांसारखे डॉक्युमेंट देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजे आता हे कागदपत्रे मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत जाण्याचे काहीही कारण नाही. आता सर्वसामान्य नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हे महत्त्वाचे डॉक्युमेंट काढू शकतात.

Tejas B Shelar
Published:
Grampanchayat Document

Grampanchayat Document : सध्याचे युग हे मोबाईलचे युग आहे. या स्मार्टफोनच्या दुनियेत, कम्प्युटरच्या जमान्यात आता सर्वच कामे ऑनलाईन होऊ लागली आहेत. यामुळे कोणतेही शासकीय अन निम शासकीय काम सहजचं होऊ लागले आहे. शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाच्या माध्यमातून आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यांसारखे डॉक्युमेंट देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजे आता हे कागदपत्रे मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत जाण्याचे काहीही कारण नाही.

आता सर्वसामान्य नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हे महत्त्वाचे डॉक्युमेंट काढू शकतात. यासाठी सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे. या एप्लीकेशनच्या मदतीने कोणतीही व्यक्ती सहजतेने त्याला आवश्यक असणारे अन ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे डॉक्युमेंट घरबसल्या मिळवू शकणार आहे.

कोणते आहे हे अँप्लिकेशन?

महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट असं या एप्लीकेशन चे नाव आहे. शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत हे एप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. या एप्लीकेशन मुळे सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व कागदपत्रे घर बसल्या आपल्या मोबाईलवर मिळवता येणार आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum या लिंक वर जाऊन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे. किंवा मग तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अँप्लिकेशन डाऊनलोड करू शकणार आहात.

कोणते दाखले मिळणार?

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या एप्लीकेशनच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व प्रकारचे दाखले डाऊनलोड करता येणार आहेत. महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल अँप हे नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक खास उपाय आहे.

हे अँप्लिकेशन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खूपच कामाचे ठरणार आहे. या एप्लीकेशन मधून ग्रामपंचायत उपलब्ध होणारे जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात आहे.

यात नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन सुद्धा भरू शकणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe