यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या ‘या’ जातींची लागवड केल्यास मिळणार विक्रमी उत्पादन !

पुढील महिन्यापासून आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू होणार आहे. रब्बी हंगामातील गव्हाची येत्या काही दिवसांनी पेरणी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Wheat Farming : सध्या खरीप हंगामातील कापूस अन सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात आले आहेत. येत्या काही दिवसांनी सोयाबीनची आणि कापसाची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. खरंतर राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीन आणि कापसाची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. ज्यांनी सोयाबीन आणि कापसाची लवकर लागवड केली होती त्यांचे पीक हार्वेस्टिंग साठी रेडी झाले आहे.

पुढील महिन्यापासून आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू होणार आहे. रब्बी हंगामातील गव्हाची येत्या काही दिवसांनी पेरणी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हालाही रब्बी हंगामातून गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर गव्हाच्या या जातीची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

त्र्यंबक : गव्हाची ही एक सुधारित जात आहे. बागायती भागात आणि वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाचा हा वाण उपयुक्त आहे. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाच्या या जातीची पेरणी करता येऊ शकते.

सरासरी 115 दिवसात या जातीचे पीक तयार होते आणि यापासून एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. हा सरबती वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे हे विशेष. या जातीचे गहू चपातीसाठी सर्वोत्कृष्ट आढळले आहेत.

गोदावरी : या जातीची बागायती भागात लागवड केली जाऊ शकते. वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाचा हा वाण फायदेशीर ठरतो. गव्हाचा हा एक बन्सी वाण आहे.

हा वाण चपातीसाठी नाही तर रवा, शेवया, कुरडया यासाठी विशेष उत्तम असल्याची माहिती तज्ञांनी दिलेली आहे. ११० दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते आणि यापासून सुद्धा 18 ते 20 क्विंटल चे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.

तपोवन : चपाती आणि ब्रेडया दोन्हींसाठी हा गहू उत्तम आहे. या गव्हाची महाराष्ट्रात लागवड करता येणे शक्य आहे. महाराष्ट्रातील बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाच्या या जातीची शिफारस करण्यात आली आहे.

या जातीचे गव्हाचे पीक 115 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते आणि या जातीपासून साधारणता 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe