धान्याचा काळाबाजार थांबवा अन्यथा मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू…..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा धडाकाच सुरु आहे. प्रलंबित मागण्या, अनुत्तरित प्रश्न, समस्यां या लोकप्रतिनिधी, प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलन हाती घेतले जाते.

दरम्यान सध्या शहरासह जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अन्नधान्याचा काळाबाजार थांबविण्यात यावा,

अन्यथा जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटीत कष्टकरी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

स्वस्त धान्य दुकानांवर फलक लावलेले नाहीत, लाभ धारकांचे वर्गवारीनुसार संख्या लिहीलेली नाही. लाभ धारकांना माल दिल्यानंतर बिलाची पावती दिली जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.

महाऑनलाईन केंद्र, सेतू केंद्र, इ सेवा केंद्र मनमानी पद्धतीने पैशांची लूट करत आहेत. स्वस्त धान्य दुकान सरकार मान्य सेतू केंद्र सरकारने नागरिकांची लूट करण्यासाठी दिलेली आहेत काय असा सवाल निवेदनात उपस्थित केला आहे.

नागरिकांची लूट थांबविण्यात यावी अन्यथा जिल्ह्याचे मंत्री बाळासाहेब थोरात, ना. शंकरराव गडाख, ना. प्राजक्त तनपुरे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment