Business Success Story:- ‘शोधा म्हणजे सापडेल’ ही जी काही उक्ती आहे ती जीवनातील बरेच प्रसंगांमध्ये किंवा बऱ्याच क्षेत्रांमध्ये लागू होते. जेव्हा एखादा व्यक्ती कुठलातरी व्यवसाय सुरू करावा असं निश्चित करते तेव्हा त्याच्या मनामध्ये अशा अनेक प्रकारचे व्यवसायांची यादी येते किंवा तो अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या शोधात असतो.
या व्यवसायांमध्ये काही प्रचलित व्यवसायांचे विचार देखील व्यक्तीच्या मनात येतात व व्यवसाय शोधत असताना अशा काही भन्नाट युक्ती येतात की त्या व्यक्तींच्या किंवा कल्पनेच्या माध्यमातून देखील आगळावेगळा व्यवसाय उभा राहू शकतो.
म्हणजेच जेव्हा व्यवसायांच्या शोधात असताना अशा काहीतरी कल्पना सापडतात किंवा युक्ती सापडतात की त्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभारला जाऊ शकतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण शिवराज निषाद या तरुण उद्योजकाची यशोगाथा बघितली तर ती या मुद्द्याला नक्कीच साजेशी आहे. या उद्योजकाने वाया जाणाऱ्या फुलांपासून आगळावेगळ्या व्यवसायाची उभारणी केली व त्या व्यवसायाच्या माध्यमातून तो आता प्रत्येक महिन्याला चार लाखांची कमाई करत आहे.
वाया जाणाऱ्या फुलांपासून महिन्याला कमावतो चार लाख
आता भारत म्हटले म्हणजे भारतामध्ये अनेक सण उत्सवांचे परंपरा आहे व अशा प्रसंगांमध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे की फुलांचा वापर संपला की शेवटी हे फुल टाकून देण्याची वेळ येते. दुसरे म्हणजे भारतामध्ये फुलशेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. सण उत्सवांमध्ये या फुलांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते व शेवटी फुलं विकली जात नाही ती नाइलाजाने शेतकऱ्यांना टाकून देण्याची वेळ येते.
परंतु याच प्रकारे उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर फेकलेली फुले व नदीत जमा होणारा कचरा शिवराज यांनी पाहिला व व्यवसायाची कल्पना त्याला सुचली. फुलांना सुकवून त्याचा आयुर्वेदिक आणि हर्बल उद्योगात अशा फुलांना खूप मोठी मागणी असल्याचे देखील माहिती शिवराजने काढली व सुरू झाला सोलर ड्रायरपासून फुलांना सुकवण्याचा व्यवसाय.
यामध्ये उत्तर प्रदेश राज्यात येणारे जे काही फुलं आहेत त्यांचा वापर कशाकरिता होऊ शकतो याचा शोध त्यांनी घेतला. उदाहरणच घ्यायचे झाले तर गोकर्ण फुलांचा हर्बल चहासाठी वापर होतो व त्याची मागणी लक्षात घेता ही फुले कशी वापरता येतील याचा विचार करत फुले वाळवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
ही एक सुरुवात होती व त्याच्यापुढे त्यांनी त्यांच्या उत्पादनाची श्रेणी विस्तृतपणे वाढवली व त्यामध्ये चहा, सिरप संरक्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे हिबिस्कस आणि केमोमाइलसह इतर फुले सुकवायला सुरुवात केली.
सोलर ड्रायने फुलांचे गुणवत्ता टिकते
याबद्दल माहिती देताना या उद्योजकाने म्हटले की, सौर ड्रायर धुळ आत जाऊ देत नाही व त्यामध्ये सुकणारे उत्पादन हे फुल ग्रेड आणि शंभर टक्के शुद्ध आहे. याबद्दल शिवराज म्हणतात की 40 ते 45 अंश तापमान स्थिर ठेवून गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता फुलांचा मूळ रंग आणि सुगंध कायम ठेवण्याची खात्री देखील या ड्रायरच्या मदतीने मिळते.
किती होते या उद्योगातून कमाई?
सौर ऊर्जेचा वापर करून शिवराज निषाद याने फुलांची नासाडी होण्यापासून चा मार्ग काढला व उत्तर प्रदेशातल्या या तरुणाने महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला. सौर उर्जेवर चालणाऱ्या ड्रायरचा वापर करून वाया जाणारी व सुकलेली फुले वाळवत त्याने अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांना विकायला सुरुवात केली.
तसेच चहाचा मसाला तयार करणाऱ्या कंपन्या व औषध बनवणाऱ्या कंपन्यांना या प्रकारची ड्रायरने सुकवलेली फुले विकत दरमहा चार लाखांची कमाई तो त्या माध्यमातून करत आहे. सध्या या व्यवसायामध्ये तो 500 ते 1000 किलो फुलांची विक्री करतो व महिन्याला एक लाखापासून ते चार लाखापर्यंत उत्पन्न मिळवतो. एवढेच नाहीतर या व्यवसायाच्या माध्यमातून शिवराजाने शेकडो शेतकऱ्यांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.