महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गावर विकसित झाला नवीन फ्लायओव्हर ! प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट, वाचा सविस्तर

वाडी मधील 10 नंबर नाकापासून सुरू झालेला हा उड्डाणपूल अडीच किलोमीटर लांबीचा आहे. या उड्डाणपुलामुळे वाडी टी-पॉइंट येथे होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता नागपुर-अमरावती महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना उड्डाण पुलावरून थेट अमरावतीच्या दिशेने वाडी शहराच्या बाहेर निघता येणार आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. नवनवीन रस्त्यांमुळे आणि महामार्गांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी फारच सुधारली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात अजूनही अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत.

नागपूर-अमरावती महामार्गावर फ्लायओव्हर उभारण्याचे काम देखील नुकतेच संपन्न झाले आहे. यामुळे नागपूर शहरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. नागपूर – अमरावती महामार्गावर नागपूरच्या वेशीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता दिलासा मिळणार आहे.

खरंतर नागपूर अमरावती महामार्गावर नागपूरच्या ऐनवेशीवर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. यामुळे या ठिकाणी फ्लाय ओव्हर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा फ्लाय ओव्हर विकसित करण्यात आला आहे.

अगदीच रेकॉर्ड टाइमिंग मध्ये हा रस्ते प्रकल्प पूर्ण झाला असून यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा पूल अडीच किलोमीटर लांबीचा असून टेस्टिंगसाठी हा पूल आता सुरू करण्यात आला आहे. वाडी मधील 10 नंबर नाकापासून सुरू झालेला हा उड्डाणपूल अडीच किलोमीटर लांबीचा आहे.

या उड्डाणपुलामुळे वाडी टी-पॉइंट येथे होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता नागपुर-अमरावती महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना उड्डाण पुलावरून थेट अमरावतीच्या दिशेने वाडी शहराच्या बाहेर निघता येणार आहे.

यामुळे नागपूर शहराच्या ऐन वेशीवर जी विनाकारण गर्दी होत होती ती कमी होणार आहे. या एका उड्डाणपूलामुळे शहरातील वाहतूक कोंडीची एक गंभीर समस्या निकाली निघण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प फक्त नागपुर मधील वाहतूक कोंडी दूर करणार नाही तर यामुळे नागपूर ते अमरावती असा प्रवास देखील जलद आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. खरे तर या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केंद्रातील सरकारने दोन वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतलाय.

या अंतर्गत नागपूर आणि वाडीमध्ये उड्डाणपूल बांधले जात आहेत. दोन उड्डाणपूल आणि काँक्रीट रस्त्याचा हा प्रकल्प 478 कोटी रुपयांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे वाडी येथील उड्डाणपूल अगदीच विक्रमी वेळेत बांधून रेडी झाला आहे. यावरून कालपासून अर्थातच 18 सप्टेंबर पासून प्रत्यक्षात वाहतूक देखील सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News