होमलोन घ्या आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करा! ‘ही’ बँक देत आहे स्वस्त व्याजदरात होमलोन, वाचा माहिती

घर खरेदी करणे हे प्रचंड प्रमाणात महागडे झाल्यामुळे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहते. बऱ्याचदा पैशांची कमतरता असल्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. परंतु आता देशभरातील प्रत्येक बँकांच्या माध्यमातून आता होमलोन मिळते व याची प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करण्यात आली असल्यामुळे घर खरेदी करणे आता सोपे झाले आहे.

Published on -

प्रत्येकाला स्वप्नातील घर बांधणे किंवा घराची खरेदी करणे ही मोठे स्वप्न असते. परंतु घर खरेदी करणे हे प्रचंड प्रमाणात महागडे झाल्यामुळे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहते. बऱ्याचदा पैशांची कमतरता असल्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. परंतु आता देशभरातील प्रत्येक बँकांच्या माध्यमातून आता होमलोन मिळते व याची प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करण्यात आली असल्यामुळे घर खरेदी करणे आता सोपे झाले आहे.

परंतु यामध्ये तुम्ही ज्या ही बँकेकडून होमलोन घेत असाल त्या बँकेचे व्याजदर पाहून होमलोन घेणे गरजेचे ठरते. कारण तुमच्या संपूर्ण होमलोनवर या व्याजदरचा खूप मोठा परिणाम होत असल्याने बँकांच्या व्याजदरामध्ये तुलना करून जी बँक तुम्हाला कमी व्याजदरात होमलोन देईल अशा बँकेकडून लोन घेऊन घर खरेदी करणे तुम्हाला परवडू शकते.

तुम्हाला देखील या दिवाळी सणाच्या निमित्ताने घर खरेदी करायचे असेल तर देशातील सर्वात स्वस्त होमलोन कोणती बँक देते? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 ही बँक देते सर्वात स्वस्त होमलोन

बऱ्याचदा होमलोन घेण्याचा निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा अनेक बँकांच्या माध्यमातून चाचपणी केली जाते व सगळ्यात जास्त पसंती स्टेट बँक ऑफ इंडियाला दिली जाते. कारण की सरकारी बँक आहे व या माध्यमातून सर्वात स्वस्त होमलोन मिळेल असा प्रत्येकाचा कयास असतो.

परंतु जर यापेक्षा स्वस्त व्याज देणारी जर बँक पाहिली तर सध्या बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया पेक्षा कमी व्याजदरात होमलोन देत आहे. बँक ऑफ बडोदा तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरात होमलोन देत असून सध्याचा बँक ऑफ बडोदा कडून गृहकर्जावर आकारण्यात येणारा प्रारंभिक व्याजदर 8.4 टक्क्यांचा आहे.

 बँक ऑफ बडोदाकडून पंधरा वर्षाच्या कालावधीकरिता 35 लाख रुपये होमलोन घेतले तर किती व्याज भरावे लागेल?

समजा तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून पंधरा वर्षांच्या कालावधी करिता 8.4 टक्के दराने 35 लाख रुपयांचे होमलोन घेतले तर तुम्हाला त्याचा मासिक हप्ता ३४२६१ रुपये इतका भरावा लागेल.

या हिशोबाने जर बघितले तर या संपूर्ण 35 लाख रुपये होमलोनवर तुम्हाला पंधरा वर्षात एकूण 26 लाख 66 हजार 986 रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल. जेव्हा तुम्ही या कर्जाची पूर्ण परतफेड कराल तेव्हा बँकेला तुम्ही व्याज व मुद्दल मिळून एकूण 61 लाख 66 हजार 986 रुपये भराल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News