दिवसाला 7 रुपयांची गुंतवणूक केल्यास महिन्याला मिळणार पाच हजार रुपयांची पेन्शन ! सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

बँकेच्या एफडी योजनेमध्ये आणि बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. अटल पेन्शन योजना ही देखील अशीच एक लोकप्रिय बचत योजना. या अंतर्गत नागरिकांना आपल्या उतार वयात हक्काची पेन्शन मिळते.

Published on -

Government Saving Scheme : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. प्रत्येक जण आपल्या परीने आर्थिक दृष्ट्या आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. भारतात सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

याशिवाय काहीजण बँकेच्या एफडी योजनेत आणि सरकारी बचत योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजेच उतार वयामध्ये पैशाचा निश्चित स्रोत असावा असे वाटते. यासाठी बँकेच्या एफडी योजनेमध्ये आणि बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. अटल पेन्शन योजना ही देखील अशीच एक लोकप्रिय बचत योजना. या अंतर्गत नागरिकांना आपल्या उतार वयात हक्काची पेन्शन मिळते.

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना वयाच्या 60 वर्षानंतर नियमित पेन्शन मिळू शकते. या योजनेत दर दिवशी सात रुपयांची गुंतवणूक केल्यास 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळते. दरम्यान आता आपण या पेन्शन योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कशी आहे अटल पेन्शन योजना?

अटल पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक अकाउंट ओपन करू शकतात. अकाउंट ओपन केल्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत यामध्ये गुंतवणूक करावी लागते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीनुसार नागरिकांना उतार वयात एक हजार, दोन हजार आणि पाच हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.

या योजनेत जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला अधिकचा फायदा मिळणार आहे. जर या योजनेतून तुम्हाला दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळवायची असेल तर वयाच्या 18 व्या वर्षी प्रतिमहा 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

दोन हजार रुपयाची पेन्शन हवी असेल तर प्रतिमहा 84 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तीन हजार रुपयांची पेन्शन हवी असेल तर 126 रुपये, 4000 रुपयांची पेन्शन हवी असेल तर 168 रुपये आणि 5000 रुपयांची पेन्शन हवी असेल तर 210 रुपये अशी गुंतवणूक करावी लागणार आहे.

अर्ज कुठे करावा लागणार

अटल पेन्शन योजनेत लोकांना गुंतवणूक सुरू करायची असेल त्यांनी आपल्या जवळील बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अकाउंट ओपन केले जाऊ शकते. या योजनेत ग्राहकांना आपल्या सोयीनुसार पैशांची गुंतवणूक करता येणार आहे हे विशेष.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe