एसबीआयकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार कर्ज, 4 लाख 50 हजाराचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?

या योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर असणाऱ्या लोकांना एक किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या अंतर्गत एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 30 हजार, दोन किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 60,000 आणि 3 किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

Tejas B Shelar
Published:
SBI Solar Panel Loan

SBI Solar Panel Loan : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरावर गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे.

याशिवाय एसबीआय सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून देते. खरे तर, विज बिलापासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात आहे.

या अंतर्गत नागरिकांना दरमहा 300 युनिट पर्यंतची मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरातील जवळपास एक कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर असणाऱ्या लोकांना एक किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

या अंतर्गत एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 30 हजार, दोन किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 60,000 आणि 3 किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

दुसरीकडे एसबीआय कडून सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आता आपण एसबीआय सोलर पॅनल बसवण्यासाठी किती कर्ज देते या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

सोलर पॅनल बसवण्यासाठी किती कर्ज मिळणार

एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, तीन किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सात टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जात आहे.

तसेच तीन किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी कमाल सहा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी, होम लोन असणाऱ्या ग्राहकांना 9.15% आणि नॉन होम लोन ग्राहक असणाऱ्यांना 10.15 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?

जर नॉन होम लोन ग्राहकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी साडेचार लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी 10.15 टक्के इंटरेस्ट रेट ने उपलब्ध झाले तर त्यांना 9594 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच सदर ग्राहकाला या काळात पाच लाख 75 हजार 640 रुपये भरावे लागतील. म्हणजेच या काळात एक लाख 25 हजार 640 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe