विखे पाटील परिवाराने निळवंडेचे पाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोडून दाखवले हे लक्षात ठेवा; डॉ.सुजय विखे पाटील

Published on -

Ahmednagar News : महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री “लाडकी बहिणी योजना” अंतर्गत महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी महिलांना मतदानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

तर दुसरीकडे विरोधकांनी निळवंडे प्रकल्पावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “विरोधकांनी टीका केली, मात्र विखे पाटील परिवाराने निळवंडेचे पाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोडून दाखवले आहे. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.” असा इशारा माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिला.

झरेकाठी आणि चणेगाव येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फूड प्रोसेसिंग युनिट आणि बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात महिला बचत गटांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आणि कामगारांसाठी पेटी व गृहउपयोगी संच वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, ग्रामीण विकासाला चालना देतानाच महिला सक्षमीकरणासाठी जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून अवितरपणे काम सुरु आहे. तसेच गावांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत, येणाऱ्या काळात विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व आदिवासी बांधवांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे.

डॉ. विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या ॲपचे विशेष कौतुक केले. “अवघ्या १० दिवसांत १६ हजार युवकांनी ॲपवर नोंदणी केली आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी पाच दिवसांत सोडवण्याची हमी आम्ही देतो. कोणालाही थेट भेटण्याची गरज नाही,” असे त्यांनी सांगितले.

“विखे पाटील परिवार नेहमीच समाजाभिमुख कार्यात अग्रेसर राहिला आहे. दातृत्‍व आणि सामाजिक भावनेला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणे हेच आमचे कर्तव्य मानले.

युवकांना आवाहन केले की, “महायुती सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा आणि विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवा. येणाऱ्या काळात सर्वांसाठी विकासाचे नवीन पर्व उभे करण्याचा आमचा निर्धार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखविले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe