Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर शासनाच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांसाठी स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीब लोकांना राशन पुरवले जाते. त्यासाठी रेशन कार्ड लागते. ज्या लोकांकडे रेशन कार्ड असते त्यांना सरकारकडून स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून दिले जाते.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना मोफत राशन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र अनेक जण शासनाच्या या योजनेचा अपात्र असूनही लाभ उचलत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हणून शासनाने या संबंधित नियम अधिक कठोर केले आहेत.
या कठोर नियमांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची देखील डोकेदुखी वाढली आहे. कोणते लोक रेशन कार्ड साठी अपात्र आहेत हे शोधण्यासाठी सरकारने ई केवायसी बंधनकारक केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेशन कार्ड धारकांना त्यांच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात भेट द्यावी लागत आहे.
आतापर्यंत अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र अजूनही अनेक जण आहेत ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दरम्यान ज्या लोकांनी अजून केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यामुळे सरकारने दिलेल्या या विहित मुदतीत सर्व शिधापत्रिकाधारकांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे.
जे लोक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्या लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि त्यांना राशन मिळणार नाही असे बोलले जात आहे. दुसरीकडे काही अन्य कारणांमुळे देखील नागरिकांचे रेशन कार्ड रद्द केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. जे लोक आयकर भरतात त्यांची शिधापत्रिका रद्द केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गाजियाबाद मध्ये तब्बल 13000 शिधापत्रिका आयकर भरत असल्याने रद्द करण्यात आली आहे. मात्र यातील अनेकांचे उत्पन्न हे करपात्र नाही. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी, बाईक किंवा इतर अन्य कारणांसाठीच्या कर्जांसाठी यातील अनेक लोकांनी आयटीआर भरला होता. मात्र याचा फटका आता या लोकांना बसत आहे.
परंतु जे लोक आयकर साठी पात्र नाहीत मात्र काही कारणास्तव ज्यांनी आयकर विवरणपत्र भरले असेल आणि त्यांचे रेशन कार्ड जर रद्द झाले असेल तर अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकते. रेशन कार्ड च्या नियमानुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न जर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असे लोक रेशन कार्ड साठी अपात्र ठरतात.
दुसरीकडे शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न जर तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असे लोक यासाठी अपात्र ठरतात. दरम्यान जर तुमचे उत्पन्न यापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर काही अन्य कारणास्तव आयकर विवरण पत्र भरलेले असेल अन या कारणाने तुमचे रेशन कार्ड रद्द झाले असेल तर तुम्ही जिल्हा पुरवठा विभागात जाऊन एक प्रतिज्ञापत्र सादर करू शकता.
या प्रतिज्ञापत्रात तुम्ही आयकर विवरण पत्र नेमके का भरले होते याचे कारण नमूद करू शकता आणि सोबतच तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील जोडावे लागणार आहे. एकदा तुम्ही हे प्रतिज्ञापत्र आणि तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र पुन्हा एकदा रिसबमिट केले की लगेचच तुमचे रेशन कार्ड सुरू होऊ शकते.