Short Term FD: 7 दिवस ते 12 महिन्यांची एफडी करा आणि मिळवा 8.75 टक्के व्याज! भरपूर मिळेल परतावा, कोणती बँक देते जास्त फायदा?

फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी हा गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांमध्ये खास करून प्रसिद्ध आहे. अनेक बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा मुदत ठेव योजना राबवल्या जातात व या बँकांच्या माध्यमातून  मुदत ठेव योजनेचा कालावधीनुसार देखील व्याजदर दिला जातो.

Ajay Patil
Published:
fd scheme

Short Term FD:- फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी हा गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांमध्ये खास करून प्रसिद्ध आहे. अनेक बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा मुदत ठेव योजना राबवल्या जातात व या बँकांच्या माध्यमातून  मुदत ठेव योजनेचा कालावधीनुसार देखील व्याजदर दिला जातो.

इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा बरेच गुंतवणूकदार फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात व त्यामुळे भारतामध्ये एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

त्यामुळे तुम्हाला देखील जर कमी कालावधी करिता एफडी करायचे असेल व या कालावधीत तुम्हाला सर्वाधिक व्याज देणारी बँक हवी असेल तर आपण या लेखामध्ये अशा काही बँकांची माहिती घेणार आहोत जे सात दिवस ते बारा महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देतात.

 या बँका देतात सात दिवस ते बारा महिन्याच्या एफडीवर सर्वाधिक व्याज

1- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना सात दिवसापासून ते एक वर्षापर्यंत कमी कालावधी करिता तीन टक्के ते सहा टक्के दरम्यान व्याज सुविधा देते.

2- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँक देखील सामान्य नागरिकांसाठी सात दिवसांपासून ते एक वर्षापर्यंत कमी कालावधीच्या एफडी करिता तीन टक्के ते सहा टक्के दरम्यान व्याजदर देते.

3- येस बँक येस बँक ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून येस बँकेच्या माध्यमातून सात दिवस ते एक वर्षाच्या कालावधीच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25% ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

4- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सात दिवस ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सामान्य नागरिकांना तीन टक्के ते 5.75% पर्यंत व्याज देते.

5- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक देखील सात दिवस ते एक वर्षाच्या कालावधीच्या एफडी वर तीन टक्के ते सात टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ देते.

6- कॅनरा बँक कॅनरा बँकेच्या माध्यमातून सात दिवस ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सामान्य नागरिकांना चार टक्के ते 6.85% पर्यंत व्याज देते.

 या काही महत्त्वाच्या बँक देखील देतात चांगले व्याज

1- युनिटी स्मॉल फायनान्स बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना सात दिवस ते एक वर्ष कालावधीसाठी 4.50% ते 7.85% व्याज देते.

2- जन स्मॉल फायनान्स बँक जन स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून देखील सात दिवसापासून ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना तीन टक्के ते 8.50 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

3- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सात दिवस ते एक वर्ष कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना सात दिवस ते एक वर्ष या कालावधी करिता चार टक्के ते 6.85 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe