जागा बळकावण्याचा ‘तो’ हेतू सफल होऊ देणार नाही; नगराध्यक्षा ममता पिपाडा म्हणतात…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राहाता नगरपालिका प्रशासनाने ईदगाह मैदानाच्या वॉल कंपाउंडच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढल्यानंतर काही लोक तेथे सध्या शाळा चालू होती, असा खोटा कांगावा करत आहेत.

अतिक्रमण काढणार्‍या नगरपालिकेवर गुन्हे दाखल करण्याची हास्यास्पद मागणी करत आहेत. परंतु नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकविण्याचा हेतू यापुढे कधीही सफल होणार नाही,

अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी दिली. त्या म्हणाल्या, नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण काढल्यानंतर नगरपालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार्‍यांनी धार्मिकतेचा वापर करून

कोव्हिडच्या काळात बेकायदा जमाव जमवला व राहाता शहराला वेठीस धरले जर गुन्हेच दाखल करायचे असेल तर समाजात तेढ निर्माण करण्याकरिता बेकायदा जमाव निर्माण करणार्‍यांवर करावे लागतील.

नगरपालिका प्रशासनाने रितसर नोटीस देऊन हे अनधिकृत शेड काढले आहे. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ईदगाह मैदान पाडले, उर्दू शाळा पाडली, अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवित आहे.

धर्माचा आव आणून काही ठराविक लोकांचीच माथी भडकावून अतिक्रमण काढून आपल्यावर अन्याय केला अशा बोंबा मारायच्या असे प्रकार राहात्यातील जनता यापुढे सहन करणार नाही असेही त्या म्हणाल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News