कर्जत-जामखेड विधानसभा : कॅबिनेट मंत्री होते तेव्हा त्यांचा पराभव झाला आता तर ते……; विद्यमान आमदार रोहित पवारांचा माजी आमदारांना टोला

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील आगामी निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. तसेच महायुतीकडून या जागेसाठी माजी आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधून रोहित पवारांनी पराभव केलाय.

Tejas B Shelar
Published:
Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk

Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आता निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील आगामी निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. तसेच महायुतीकडून या जागेसाठी माजी आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधून रोहित पवारांनी पराभव केलाय.

विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत ते कॅबिनेट मंत्री म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. खास बाब म्हणजे राम शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र असे असतानाही गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान गेल्या वेळीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे यांनी कंबर कसली आहे.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी कर्जत जामखेडमधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ठाकरे गटातील कर्जत जामखेड चे तालुकाध्यक्ष देखील भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांना मोठा राजकीय धक्का बसेल अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशावर आणि आगामी निवडणुकी संदर्भात कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. तसेच त्यांनी माजी आमदार तथा विद्यमान विधानपरिषद आमदार राम शिंदे यांना टोला लगावला आहे. काल बुधवारी पत्रकारांशी बोलताना रोहित दादा यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा लोकांचे लक्ष लागले आहे.

पण मी पाच वर्षांपासून लोकात आहे, जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. पण, आता काही लोक निवडणूका आल्या की लोकांमध्ये जात आहेत. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिले. त्यावेळी ते (राम शिंदे) कॅबिनेट मंत्री होते आता तर ते विधान परिषदेचे आमदार आहेत.

म्हणून आता आम्हाला विजय मिळवयाचा नाही तर लिड वाढवयाचे आहे. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम आहे असे म्हणत विद्यमान आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या जागेवरून आपण जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. खरंतर अजून महायुतीकडून तसेच महाविकास आघाडी कडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत.

परंतु कर्जत जामखेड बाबत परिस्थिती भिन्न आहे. कर्जत जामखेड मधून फडणवीस यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांनाच येथून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडी कडून या जागेवर विद्यमान आमदारचं उभे राहतील असे जवळपास फिक्स आहे. तसेच यावेळी आमदार रोहित पवार यांनी राळेभात तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबतही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हटले की, केवळ बातमी व्हावी म्हणून काही जणांचे प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेत. तसेच ज्यावेळी महिलावर अत्याचार होतात, शेतकरी अडचणीत आला, युवा वर्ग अडचणीत असतो त्यावेळी फडणवीस वेळ देत नाही पण प्रवेशाला वेळ देतात यावरून कर्जत जामखेडचे वजन महाराष्ट्रात वाढले आहे सिद्ध होते असं म्हणतं फडणवीस यांनाही घेरले आहे.

पुढे बोलताना आमदार पवार यांनी 28 तारखेला खर्डा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात अनेक जणांचा प्रवेश होणार आहे. पण, राज्यात बातमी व्हावी म्हणून किंवा हवा व्हावी म्हणून आमचे प्रवेश नाही असे म्हणतं त्यांनी भाजपाने तेते अन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe