संग्राम जगताप यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय होणार ? जयंत पाटलांचा जगतापांवर निशाणा

येत्या निवडणुकीत राज्यातील बहुतांशी जागांवर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत रंगणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील असेच चित्र पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाचा उमेदवार आणि अजित दादा गटाचा उमेदवार येथे मैदानात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:
Jayant Patil On Sangram Jagtap

Jayant Patil On Sangram Jagtap : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाच्या माध्यमातून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात धडकली होती.

त्यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

येत्या निवडणुकीत राज्यातील बहुतांशी जागांवर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत रंगणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील असेच चित्र पाहायला मिळणार आहे.

शरद पवार गटाचा उमेदवार आणि अजित दादा गटाचा उमेदवार येथे मैदानात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजून फायनल झालेला नाही. परंतु उमेदवार शरद पवार गटाचाच राहणार असे दिसत आहे. दरम्यान आज अहमदनगर शहरात दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटलांनी जगतापांवर जोरदार निशाणा साधला आहे.

संग्राम जगताप यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत आजची सभा गाजवली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या भाषणात असे म्हटले की, विषय जुना… बघितली… नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी वाढली आहे.

काही व्यापारी मला भेटले, तेही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत रोज सकाळी, विषय जुना… कशाला करता ? आमची सत्ता आल्यावर तुम्हाला नवा विषय आम्ही देऊ, असे म्हणतं जगतापांवर जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी त्यांना म्हणजेच संग्राम जगताप यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय होणार ? म्हणून त्यांचा हा सारा खटाटोप सुरू असल्याचे म्हटले.

आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकांना सुद्धा उजाळा दिला. ते म्हटलेत की, लोकसभेच्या निवडणुकीत नगरच्या जनतेने बलाढ्य शक्तीचा पराभव केला आहे. येथील जनता खूपच सुज्ञ आहे.

गेल्या निवडणुकीत जनशक्तीने धनशक्तीचा पराभव केला आहे. याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेत करायची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुती खूपच हवेत होती मात्र आता ती जमिनीवर आली आहे.

महायुती सरकार आता त्यांना पाहिजे त्या घोषणा करत आहे. मात्र केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. पण जेव्हा आमचे सरकार येईल आम्ही यापेक्षा उत्तम योजना आणू अन त्या पूर्ण देखील करू अशी ग्वाही दिली आहे.

त्यांनी महिला सुरक्षिततेचा देखील मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही असे म्हणत जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा कायद्यात दुरुस्ती करू आणि पोलिसांवर जबाबदारी निश्चित करून महिलांना सुरक्षित करू असे आश्वासन दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe