सणासुदीच्या काळात बाजारपेठीतील दुकानांना रात्री 9 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीचे दिवस लक्षात घेता शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली येथील सर्व दुकानांना रात्री 9 वाजे पर्यंत वेळ वाढवून देण्याच्या

मागणीचे निवेदन मोची व सारडा गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली.

कोरोनाच्या संकटकाळात टाळेबंदीनंतर सर्वच व्यवसाय व दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. लवकरच नवरात्र व दिवाळी हे महत्त्वाचे सण सुरु होणार आहे. या सणा निमित्ताने बाजारपेठ पुर्वपदावर येण्याची आशा आहे.

मात्र महापालिका व पोलीस प्रशासनाकडून संध्याकाळी 7 वाजता सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले जात आहे. अन्यथा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुली राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे येथील आयुक्तांनी आदेश काढले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

पुणे शहराप्रमाणे अहमदनगर मध्ये जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ सणासुदीच्या दिवसात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहण्यासाठी वेळ वाढविण्यासंदर्भात आदेश देऊन

शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांना दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर कापड बाजार, मोची गल्ली व सारडा गल्ली येथील व्यापारी व दुकानदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment