ऑक्टोबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार, कितीने कमी होणार सिलेंडरच्या किमती ?

येत्या ऑक्टोबर महिन्यात देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. आगामी निवडणुका पाहता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भात सरकार कडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Published on -

Gas Cylinder Price : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबर मोडले आहे. मात्र सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. पुढील महिन्यातही देशात गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत.

तेल विपणन कंपन्या एक ऑक्टोबर 2024 पासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान हा सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांच्या बिगुल वाचणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या.

आतापर्यंत जेव्हा केव्हा निवडणूक जवळ आली आहे तेव्हा सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केले आहेत. यामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधीही गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

खरंतर लोकसभा निवडणुकीपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या म्हणजेच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती बदललेल्या नाहीत. परंतु व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती अनेकदा बदलल्या आहेत.

येत्या ऑक्टोबर महिन्यात देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. आगामी निवडणुका पाहता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भात सरकार कडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

परंतु विधानसभा निवडणुका लक्षात घेता येत्या महिन्यात 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडर आणि 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

यामुळे सरकार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढील महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe