पुणेकरांना लवकरच मिळणार Vande Bharat Sleeper Train, शयनयान प्रकारातील देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ मार्गावर सुरू होणार

महाराष्ट्रातील पुणे शहरातून भारतातील पहिली शयनयान प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याच्या खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Railway News

Pune Railway News : पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. अशातच, आता महाराष्ट्रासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याला देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान मिळणार आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरातून भारतातील पहिली शयनयान प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याच्या खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.

बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन, ज्याचा नमुना म्हणजे प्रोटोटाइपचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ही ट्रेन आता पुणे-दिल्ली मार्गावर चालवली जाणार असे संकेत मिळत आहेत आहे.

राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार असून त्यासाठी रेल्वे मंत्रालयाला निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या पुणे ते हुबळी दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पुण्याचे खासदार मोहोळ यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला असे सांगितले की की, ही ट्रेन पुणे विभागाला देण्यासाठी आम्ही रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ती लवकरच सुरू होईल.

यामुळे पुण्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे दिसते. वंदे भारत स्लीपर ट्रेन 2-3 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रोटोटाइपवरून असे दिसून आले आहे की ट्रेनमध्ये 16 डबे आहेत, ज्यात 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच आणि 1 एसी फर्स्ट क्लास कोच असतील.

वंदे भारत एक्सप्रेस ही केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारची प्रमुख ट्रेन आहे, ज्याचा उद्देश रेल्वेला अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनवणे असा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe