नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते.

पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
- Ahilyanagar News : मनपा प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांची हरकत आरक्षणाचा उल्लेख टाळून केलेले प्राधिकृत प्रकाशन कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 33 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे गव्हाचे नवीन वाण विकसित, वाचा सविस्तर
- बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख ठरली ! शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट
- गोव्याला पिकनिकला जाणार आहात का ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, वाचा सविस्तर