आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा, पण ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही

या योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या महिलांना अजून या योजनेचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, आता आपण कोणत्या महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही आणि या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी या महिलांना काय करावे लागणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार असून आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला अर्थातचं काल पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्यातील शिंदे सरकारने या योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळतील असे सांगितले होते. त्यानुसार या योजनेचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

खरंतर तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 25 सप्टेंबर पासूनच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि हे पैसे 29 सप्टेंबर पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार होते. त्यानुसार काल या योजनेच्या पात्र महिलांना सप्टेंबरचे पैसे मिळाले आहेत.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नव्हते त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या पैसे एकत्रितरीत्या देण्यात आले आहेत.

दुसरीकडे ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते त्यांना आणि ज्यांना आधीच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये देण्यात आले आहेत.

तथापि, अशाही अनेक महिला आहेत ज्यांना अर्ज करूनही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या महिलांना अजून या योजनेचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, आता आपण कोणत्या महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही आणि या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी या महिलांना काय करावे लागणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

या महिलांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र ज्यांचा अर्ज स्वीकारला गेला नसेल, किंवा अर्ज भरताना चुका झाल्या असतील अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

आता या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागणार आहे. यानंतर या महिलांचा अर्ज स्वीकृत होईल आणि मग या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्याचबरोबर बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसलेल्या महिलांना देखील या योजनेचे पैसे मिळालेले नाहीयेत.

त्यामुळे ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करणे अपेक्षित आहे. जेव्हा बँक खात्याला आधार क्रमांक लिंक होईल तेव्हा या योजनेचा पैसा पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe