मान्सून 2024 संदर्भात नवीन अंदाज : परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस राहणार? हवामान खात्याने सारं काही सांगितलं

आय एम डी ने परतीच्या पावसा संदर्भात बोलताना असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्ये नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या भागातून सध्या मान्सून एक्झिट घेत आहे. पण अजून या भागातून मान्सून पूर्णपणे परतलेला नाही.

Published on -

Monsoon 2024 : मान्सून आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या महिन्यात सुरू झाला असून लवकरच मान्सून देशातून माघारी परतणार आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबरच्या सुमारास मान्सून देशातून माघार घेत असतो. मात्र यावर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशिराने सुरुवात झाली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात नुकतेच एक मोठी माहिती दिली आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस पर्यंत राहणार यासंदर्भात हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये माहिती दिली आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात सरासरीपेक्षा 126 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे.

मध्य महाराष्ट्र अर्थातच खानदेशातील तीन जिल्हे नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये या चार महिन्यांच्या काळात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे यंदा म्हणजेच मान्सून 2024 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 139% अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात संपूर्ण पावसाळ्याच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात साधारणता 747.4 मी पाऊस कोसळतो. पण यावर्षी मध्य महाराष्ट्रात 1335.8 मीमी पाऊस पडला आहे.

कोकणाबाबत म्हणजेच मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाबाबत बोलायचं झालं तर यंदा सरासरीपेक्षा 129 टक्के, मराठवाड्यात म्हणजेच छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, जालना या भागात सरासरीपेक्षा 120% आणि विदर्भात सरासरीपेक्षा 117% पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अर्थातच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही यंदा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. दुसरीकडे आय एम डी ने परतीच्या पावसा संदर्भातही मोठे भाकीत वर्तवले आहे.

आय एम डी ने परतीच्या पावसा संदर्भात बोलताना असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्ये नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या भागातून सध्या मान्सून एक्झिट घेत आहे. पण अजून या भागातून मान्सून पूर्णपणे परतलेला नाही.

मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून माघारी फिरेल. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर येत्या चार दिवसांनी अर्थातच पाच ऑक्टोबरनंतर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढेल अन त्यानंतर मान्सून माघारी फिरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News