ऑक्टोबर सुरु झाला, या महिन्यात कस राहणार हवामान ? परतीचा पाऊस ‘या’ तारखेपासून पुन्हा सक्रिय, पंजाब डख यांचा अंदाज

सहा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील हवामान चेंज होईल आणि 6 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Published on -

Panjab Dakh News : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात हवामान कसे राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुगीचे दिवस सुरू आहेत. सोयाबीन, कापूस, उडीद सारख्या पिकांची हार्वेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे या काळात पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते.

हेच कारण आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस कसा राहणार कोणकोणत्या तारकांना राज्यात पाऊस पडणार या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातोय. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात जवळपास पाच तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असे म्हटले आहे.

पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडेल मात्र विखुरलेला पाऊस पडणार आहे. सर्वदूर पाऊस पडणार नाही. पाऊस झाला तरी हलका पाऊस पडणार त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी शेती पिकांची काढणी करून घ्यावी असा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.

कारण की सहा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील हवामान चेंज होईल आणि 6 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात देखील राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सहा, सात, आठ आणि नऊ ऑक्टोबरला पाऊस झाल्यानंतर राज्यात काही काळ पावसाची उघडीप राहील पण, पुढे 23, 24 आणि 25 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.

तसेच यंदा 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असेही पंजाबरावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सगळीकडे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे.

खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अन सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळाला. यासोबतच कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असल्याची नोंद हवामान खात्याच्या दप्तरी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!