Maharashtra New Expressway : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे. मुंबई ते बेंगलोर दरम्यान हा नवीन महामार्ग तयार होणार असून या महामार्गाची लांबी 800 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहील आणि यावर विमान उतरवण्याची सुविधा देखील विकसित केली जाणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई ते बेंगलोर दरम्यान विकसित होणाऱ्या या नव्या महामार्गाची लांबी 800 km राहील.

हा सहा पदरी महामार्ग असून या महामार्गावर पाच ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गावर मालवाहू विमान उतरण्याची सोय म्हणजेच धावपट्टी बांधण्यात येणार आहे.
परिणामी राज्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे.
सांगली जिल्ह्यात या महामार्गाची लांबी 74 किलोमीटर एवढी राहणार असून यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने नवीन संजीवनी मिळणार आहे.
हा महामार्ग सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी विकासाचे प्रवेशद्वार म्हणून काम करणार आहे. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी हा महामार्ग मोलाची भूमिका निभावेल.
एवढेच नाही तर नितीन गडकरी यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात रिंग रोड विकसित होणार असून यासाठी 273 कोटी रुपये मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.
सध्या या रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून जर नागरिकांनी सहकार्य केले तर या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि लवकरच हा रिंग रोड नागरिकांसाठी खुला होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
खरे तर गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्प प्रस्तावित आहेत.
मुंबई बेंगलोर महामार्ग प्रकल्प देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास जलद होणार आहे. तसेच पुढे बेंगलोरला सुद्धा जलद गतीने जाता येणार आहे.