एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेने लॉन्च केली 400 दिवसांची नवीन एफडी योजना, वाचा सविस्तर

बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. यामुळे अनेकांनी या बँकेच्या एफडी योजनेत आपली जमापुंजी गुंतवलेली दिसते. दरम्यान या बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आता 400 दिवसांची नवीन FD स्कीम लॉन्च केली आहे.

FD News

FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. आज आपण अलीकडेच देशातील एका सरकारी बँकेने लॉन्च केलेल्या एका विशेष FD योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. बँक ऑफ इंडिया ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी चारशे दिवसांची नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे.

बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. यामुळे अनेकांनी या बँकेच्या एफडी योजनेत आपली जमापुंजी गुंतवलेली दिसते.

दरम्यान या बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आता 400 दिवसांची नवीन FD स्कीम लॉन्च केली आहे. आता आपण ही एफडी स्कीम नेमकी कशी आहे, यासाठी किती व्याजदर लागू करण्यात आले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ इंडिया ची नवीन एफडी योजना

बँक ऑफ इंडिया 400 दिवसांत परिपक्व होणाऱ्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक 8.10 टक्के व्याजदर देत आहे. या मुदत ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक देशातील कोणत्याही शाखेत जाऊन गुंतवणूक करू शकतात.

याशिवाय, डिजिटल चॅनेल (BOI ओम्नी निओ ॲप/इंटरनेट बँकिंग) द्वारे देखील गुंतवणूक केली जाऊ शकते. एफडीचे दर २७ सप्टेंबर २०२४ पासून लागू राहणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या विशेष FD योजनेअंतर्गत तुम्हाला 3 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळेल.

बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD योजनेवर 8.10 टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.95 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ते सामान्य नागरिकांसाठी 7.45% व्याज दर देत आहे.

भारतात राहणारे लोक, NRI, NRO या मुदत ठेवीचा लाभ घेऊ शकतात. सणासुदीची भेट म्हणून, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने 3.00 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी अतिशय आकर्षक व्याजदरावर विशेष 400 दिवसांची एफडी स्कीम सुरू केली आहे.

नक्कीच एफ डी करणाऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या या योजनेतून चांगला परतावा मिळू शकणार आहे. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर बँक ऑफ इंडियाची ही एफ डी योजना तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe