पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस

पंजाबरावांनी राज्यात 9 ऑक्टोबर पासून पाऊस सुरू होईल असे म्हटले आहे पण काही भागांमध्ये सात अन आठ ऑक्टोबर दरम्यान ही पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील सातारा, सांगली धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाची व्याप्ती ही 9 ऑक्टोबरपासूनच वाढणार आहे.

Published on -

Panjabrao Dakh Havaman Andaj : ऑक्टोबर चा पहिला आठवडा हा जवळपास कोरडाच गेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झालाय. पण पावसाचा जोर हा पहिला आठवड्यात कमीच राहिला. पण आता ही परिस्थिती बदलू पाहत आहे. कारण की, आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे. या काळात राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र कडून पावसाला सुरुवात होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून समोर येत आहे. 9 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होईल आणि 14 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहील.

या काळात मुंबई, नाशिक, कोकण किनारपट्टी म्हणजेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भ वगळता या काळात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. मात्र या काळात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी राहू शकते. विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागात या काळात पावसाचे प्रमाण कमी राहणार असा अंदाज आहे.

पंजाबरावांनी राज्यात 9 ऑक्टोबर पासून पाऊस सुरू होईल असे म्हटले आहे पण काही भागांमध्ये सात अन आठ ऑक्टोबर दरम्यान ही पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील सातारा, सांगली धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे.

मात्र पावसाची व्याप्ती ही 9 ऑक्टोबरपासूनच वाढणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन आखण्याआधी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा असा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे. पावसाची शक्‍यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे जेणेकरून शेती पिकांचे नुकसान होणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.

खरंतर सध्याचा पाऊस हा खरीप हंगामातील पिकांसाठी नुकसानदायी ठरण्याची भीती आहे मात्र या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांसाठी हा परतीचा पाऊस फायद्याचा ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News