7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा पावन पर्व सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात अगदीच आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. ह्या अशा प्रसन्न वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सणाला चांदी होईल असे दिसते. कारण की, धनत्रयोदशीपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.

सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारात जोडून दिला जाऊ शकतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ मंजूर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पगारात मोठी हनुमान उडी पाहायला मिळणार आहे.
यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र हा महागाई भत्ता लवकरच 53% होणार अन ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे.
केंद्रीय कर्मचारी जुलै 2024 पासूनच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसांत डीएमध्ये ३ टक्के वाढ होणार आहे. डीए वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीचं वाढ होणार आहे.
आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ५० टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. पण, त्यात आणखी ३ टक्के भर पडल्यास डीए ५३ टक्के होईल. म्हणून या सरकारी नोकरदार मंडळीला तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. यामुळे या लोकांची दिवाळी आनंदाने साजरी होईल असे चित्र आहे. तथापि महागाई भत्ता वाढी संदर्भातील निर्णय नेमका कधी होणार हे अजून क्लिअर झालेले नाही.
परंतु दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढत असतो यामुळे या चालू महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.