ग्राहकांच्या सोयीसाठी ‘ही’ बँक देणार ऑनलाईन कर्ज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश व्यवहार हे चलनी स्वरूपात न होता लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना पसंती दिली होती. याच धर्तीवर बँकांनी देखील ऑनलाईन सुविधांवर भर दिली होती.

याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या बँकेने ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन योजना आणली आहे.

कोरोनाच्या काळात याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. कर्जदारांसाठी ही योजना लाभदायक ठरेल. प्रवरा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात,

यासाठी बॅंकेच्या सर्व शाखांमधून ऑनलाइन कर्जप्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा सहकारी बॅंकेच्या दाढ येथील शाखेचे नवीन कार्यालयात स्थलांतर झाले.

त्यावेळी विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, की प्रवरा सहकारी बॅंकेने संपूर्ण वाटचालीत सामान्य माणसाला आधार दिला. ग्राहकांचा विश्‍वास संपादन केल्यामुळेच अडचणीचा काळ असूनही,

बॅंकेने सप्टेंबर अखेर एक हजार कोटींचा टप्पा पूर्ण केला. बॅंकेचे संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नांचे हे यश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment