Government Employee News : सध्या संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण येणार आहे. त्यानंतर मग दिवाळीचा सण येणार आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या आधीच राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या 18000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून दिवाळी बोनस दिला जाणार आहे.

या नोकरदार मंडळीला दिवाळीपूर्वी 8.33% दिवाळी बोनस आणि 23 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यामुळे या सरकारी नोकरदार मंडळीची दिवाळी गोड होईल अशी आशा आहे.
यासंदर्भात पुणे महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाने एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुणे महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस ची घोषणा केली जात असते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदर नोकरदार मंडळीला दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान दिला जातो. यानुसार यंदाही पुणे महापालिकेकडून महापालिका अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस दिला जाणार असून याबाबतचे परिपत्रक देखील निघाले आहे.
यामुळे या नोकरदार मंडळीची यंदाची दिवाळी नक्कीच मोठ्या आनंदात साजरी होणार आहे. महापालिकाने यासाठी 125 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले असून, दिवाळीपूर्वी दिवाळी बोनसची आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मात्र, दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदानची रक्कम अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस राहील. ज्या कर्मचाऱ्यांची हजेरी 180 दिवसांपेक्षा कमी राहील त्यांना याचा लाभ मिळणार नाही.