‘छोट्या माणसाच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नका, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही’, मंत्री विखेंचे लंकेंना खरमरीत उत्तर

यंदाच्या निवडणुकीत मात्र थोरात यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आव्हान देणार आहेत. त्यांनी थोरात यांच्या गावी जाऊन त्यांना 35 वर्षे दिलेत मला फक्त पाच वर्षे द्या असे म्हणत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Vikhe Patil News

Vikhe Patil News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील असेच चित्र आहे.

या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे निवडणूक लढवणार आहेत. ते सलग आठ वेळा येथून निवडून आले आहेत. म्हणजेच त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचे तब्बल 40 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत मात्र थोरात यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आव्हान देणार आहेत. त्यांनी थोरात यांच्या गावी जाऊन त्यांना 35 वर्षे दिलेत मला फक्त पाच वर्षे द्या असे म्हणत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान याच संदर्भात निलेश लंके यांनी एक विधान केले आहे. त्यांनी सुजय विखे पाटील जर संगमनेर मधून उभे राहिलेत तर थोरात साहेबांना प्रचारासाठी जाण्याचीच गरज राहणार नाही, ते सहज निवडून येतील असे म्हटले आहे.

लंके म्हटलेत की माझी निवडणूक म्हणजेच लोकसभेची निवडणूक तरी कट टू कट झाली पण जर सुजय विखे संगमनेर मधून विधानसभेसाठी उभे राहिलेत तर ती निवडणूक वन साईड होईल.

थोरात साहेबांना प्रचाराला देखील जावे लागणार नाही, ते सहज निवडणूक जिंकतील असे म्हणत सुजय विखे पाटील यांना डिवचलं आहे. दुसरीकडे आता लंके यांच्या या विधानावर सुजय विखे पाटील यांचे वडील अन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छोट्या माणसाच्या विधानाकडे फारसे लक्ष देऊ नका, त्यांच्या आरोपांना, विधानाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी लंके यांना खरमरीत उत्तर दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe