Vaibhav Pichad Vs MLA Kiran Lahamate : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विजयादशमी नंतर केव्हाही निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अजून पर्यंत मात्र महा विकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार फायनल झालेले नाहीत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये काही जागांवर चांगलीच चुरस रंगलेली आहे. सध्या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर रस्सीखेच सुरु आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचे वैभव पिचड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे आमने-सामने झाले आहेत.
दरम्यान वैभव पिचड यांनी आमचा आमदार बालिश आहे, ते कुठल्या परिपक्वतेने बोलतात हेच कळत नाही अशी टीका आमदार लहामटे यांच्यावर केली आहे. दुसरीकडे आमदार किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांना वैफल्यग्रस्त असल्याचे संबोधले आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे.
‘आमचा आमदार बालिश आहे, ते कुठल्या परिपक्वतेने बोलतात हेच कळत नाही’ ; वैभव पिचड यांची आ. लहामटेवर बोचरी टिका
वैभव पिचड यांनी, अधिकृतरित्या उमेदवारांच्या घोषणा झालेल्या नाहीत. जेव्हा अधिकृतरित्या उमेदवारांची घोषणा होईल तेव्हा आम्ही आमची भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आमचा आमदार बालिश आहे.
त्यांना जर या ठिकाणी जनता कळत नाही, जनतेला लाथ मारतोय, किरकोळ कारणावरून पोलिसांना बोलावून त्यांना आतमध्ये टाकतोय. जर या पद्धतीने त्यांचं वागणं असेल तर ते बालिशच आहेत. ते कुठल्या परिपक्वतेने बोलतात त्यांनाच कळत नाही असे म्हणत विद्यमान आमदारावर टीका केली आहे.
आमदार लहामटे यांनी डिवचलं
आमदार किरण लहामटे यांनी, ‘वैभव पिचड हा आधीच वैतागलेला माणूस आहे. मागच्या विधानसभेत त्याला 55000 चा आकडा पार करता आला नव्हता. त्यामुळे गेल्या वेळी पण त्याची मनस्थिती बिघडलेली होती. मध्ये आमच्याच काही कलाकारांनी दूध संघात त्यांना वाचवलं.
आता परत तिकिटाचा वांदा आहे, म्हणून त्यांची मनस्थिती बरोबर नाही. यामुळे ते काहीही विधान करतात. मी ठामपणे सांगतो की, किरण लहामटे यांची घड्याळाची उमेदवारी फायनल आहे,’ असं म्हणतं पिचड यांना डिवचलं आहे.