7th Pay Commission News : दसऱ्याच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान हा सण साजरा होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे.
काल राज्याच्या वित्त विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची आणि गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्यांना आता आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. कारण की शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांची उपदानाची रक्कम वाढवली आहे.
राज्यातील निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.
यानुसार, राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती उपदान तसेच मृत्यू उपदानाची कमाल रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आधी ही कमाल रक्कम 14 लाख रुपये एवढी होती.
मात्र या रकमेत 6 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अर्थातच राज्यातील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान म्हणून कमाल वीस लाख रुपये दिले जाणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे याची अंमलबजावणी ही एक सप्टेंबर 2024 पासूनच होणार आहे. राज्य शासनाने काल अर्थातच 10 ऑक्टोबरला या संदर्भातील शासन निर्णय जारी केलेला आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने काल हा शासन निर्णय निर्गमित केला असून या निर्णयामुळे राज्यातील असंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. यामुळे सदर निर्णयाचे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.