Pune News : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे.
मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास निश्चितच वेगवान सुरक्षित आणि वाहतूक कोंडीविना होत आहे. मात्र मेट्रोचे जाळे संपूर्ण पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पहावी लागणार आहे.
तथापि, मेट्रो सोबत शहरात असेही काही रस्ते मार्ग तयार केले जात आहेत ज्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळतोय. दरम्यान, पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नाशिक फाटा ते खेड यादरम्यान एलिव्हेटेड कॉरिडोर विकसित केला जाणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच पुणे- नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड महामार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड महामार्ग हा रेसिडेन्सिअल आणि इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा मोठा दुवा होणार आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीशील वाटचालीला नवा आयाम मिळणार आहे.
हेच कारण आहे की, हा प्रकल्प शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान, आता याच प्रकल्पासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकल्पाला स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव दिले जावे अशी मागणी उपस्थित केली जात आहे. या मार्गाला रतन टाटा एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून नाव द्यावे.
ज्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना स्व. रतन टाटा यांचे सदैव स्मरण राहील, अशी आमची भावना आहे, अशी मोठी मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या एलिव्हेटेड कॅरिडॉरला रतन टाटा यांचे नाव देणे उचित होणार असे मत लांडगे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी या मार्गाला स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव मिळावे यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सुद्धा दिले आहे. यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाला स्वर्गीय रतन टाटा जी यांचे नाव मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.