Government Employee News : काल अर्थातच 12 ऑक्टोबरला संपूर्ण देशात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण साजरा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांनी देशात आता दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे. दरम्यान या दिवाळी सणाच्या आधीच महाराष्ट्रातील अनेक महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी देखील यावेळी दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 18 हजार कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

या संबंधित नोकरदार मंडळीला दिवाळी सणाचे औचित्य साधून 8.33% बोनस तसेच 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे पुणे महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा दिवाळी सण यंदा थाटामाटात साजरा होऊ शकणार आहे.
यामुळे महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा दिवाळी बोनस हा कर्मचारी आणि अधिका-यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीचं जमा करण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
याबाबत महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने परिपत्रक सुद्धा जारी केलं आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस मिळत असतो. यंदाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनसची घोषणा करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. नाशिक महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.
एवढेच नाही तर महापालिका अंतर्गत मानधनावर काम करणाऱ्या 550 कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे मात्र नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर 9 कोटी 55 लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
पुणे आणि नाशिक महानगरपालिका प्रशासनाने बोनस जाहीर केल्यानंतर ठाणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील बोनसची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 24 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. गेल्यावेळी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २१,५०० रुपयांचे सानूग्रह अनुदान मिळाले होते मात्र यावेळी यामध्ये अडीच हजारांची वाढ करण्यात आली असून सानूग्रह अनुदान म्हणून 24 हजार रुपयांची रक्कम संबंधित नोकरदार मंडळीच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.